- पूर्वीच्या ६ रुग्णांपैकी ४ जणांचा अहवाल निगेटिव्ह…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० डिसेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात आज नवीन ४ रुग्ण ओमायक्रॉन बाधीत आढळून आलेले आहेत. हे ४ रुग्ण यापूर्वी नायजेरीया येथुन आलेल्या प्रवाशांचे निकट सहवासीत आहेत. त्यांना नवीन जिजामाता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे.
आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ‘ ओमिक्रॉन ‘ या करोनाच्या नव्या उत्परिवर्तित ( Mutation ) विषाणूचा फैलाव वेगाने वाढत आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये परदेशातून आलेल्या प्रवाशांचे देखील क्षेत्रिय कार्यालय स्तरावर सर्वेक्षण सुरु आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने परदेशामधून आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे.
यापूर्वी ओमायक्रॉन बाधीत असलेल्या ०६ रुग्णांची पुन्हा १० व्या दिवशी कोविड १९ तपासणी करण्यात आली असता ४ रुग्णांचा कोविड १९ तपासणीचा अहवाल नकारात्मक आला असून सदर ४ रुग्णांना घरी सोडुन गृहविलगीकरणात ठेवण्यात आलेले आहे. उर्वरीत २ रुग्णांचा अहवाल सकारात्मक आला आहे.
नवीन २२ कोविड १९ पॉझिटीव्ह रुग्णांपैकी १९ रुग्ण नवीन भोसरी रुग्णालय येथे व ३ रुग्ण खाजगी रुग्णालयात दाखल आहेत. या सर्वांची प्रकृती स्थीर आहे. या २२ रुग्णांचे नवीन ‘ ओमिक्रॉन ‘ या करोनाच्या व्हेरिएंटच्या तपासणी कामी नमुने जिनोम सिकव्हेंसिंग ( Genome sequencing ) करिता एनआयव्ही पुणे येथे पाठविण्यात आलेले आहेत.