- भोसरीतील घटना; अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ डिसेंबर २०२१) :- भोसरीतील लांडेवाडी चौकातुन मंगळवारी पीएमपीएमएलच्या बसमधून प्रवास करताना सकाळी ११.३५ वाजता एमआयडीसी कॉर्नर येथे आले असता फिर्यादीला आपल्या खिशातील ५० हजारांची रोकड चोरीस गेल्याचे दिसून आले.
याप्रकरणी सुभाष नारायण शिरभाते (वय ६८, रा. आळंदी रोड, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.