- आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी सुरु…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ जून २०२१) :- दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय पिंपरी – चिंचवड महापालिका भवनात प्रवेश दिला जाणार नाही. प्रमाणपत्र नसलेल्या काही नागरिकांना सुरक्षारक्षकांनी महापालिकेत प्रवेश दिला नाही. परिणामी, त्यांना माघारी फिरावे लागले.
पिंपरी – चिंचवड शहरात कोरोना तसेच, ओमायक्रॉनचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. दोन डोस घेतल्याशिवाय शॉपींग मॉल, हॉटेल, कंपन्या, शाळा, कर्मचारी महाविद्यालय, शासकीय व सरकारी कार्यालये आदी ठिकाणी कर्मचारी व नागरिकांना प्रवेश देण्यात येऊ नये, असे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसे आदेश महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी नुकतेच दिले आहेत. त्या नियमाची महापालिकेत अंमलबजावणी बुधवार दि. ५) पासून करण्यात आली.
महापालिका भवनात येणाऱ्या प्रत्येक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, ठेकेदार, त्यांचे प्रतिधिनी व इतरांकडे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सुरक्षारक्षकांकडून तपासले जात होते. त्यासोबतच पालिकेत कोणत्या विभागात काम आहे, याची विचारणा केली जात होती. यावेळी प्रमाणपत्र नसणाऱ्या व्यक्तीस प्रवेश नाकारला जात होता.