न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जून २०२२) :- पैसे परत न केल्यामुळे आरोपींनी त्यांच्या मारुती सुझुकी सियाज या कारमध्ये फिर्यादीच्या काकाच्या मुलाला बसवून अपहरण करून नेले. आरोपीने फिर्यादीला आगाऊ आठ हजार रुपये दिले होते.
रमाकांत वर्मा (वय २७ वर्षे, पिंपळे सौदागर) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना पिंपळे सौदागर येथे घडली. राज राठोड (वय २८ वर्षे रा. दापोडी), मुन्नीलाल चौहान (रा. बाणेर), राजू यादव (वय ३० वर्षे, रा. बाणेर), विनोद यादव (वय ३६, रा. बाणेर) या चार जणांना अपहरणप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आरोपींच्या विरोधात भा. द. वि. कलम ३६४ (अ) ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना अटक केली आहे.