- पवना धरणात २४ टक्के पाणीसाठा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ जुलै २०२२) :- पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणार्या पवना धरण क्षेत्रात गेल्या पाच दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे या धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. दरम्यान, अद्यापही धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मावळ तालुक्यासह पिंपरी – चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात रविवारी सकाळपर्यंत २३.९० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गतवर्षी तो ३४ टक्क्यांवर होता. धरण क्षेत्रात ७७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीसाठा जवळपास २४ टक्क्यांवर पोहोचला आहे. आजपर्यंत ५४५ मिली मीटर पाऊस पडला आहे, अशी माहिती पालिकेने दिली आहे.