- वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २५ ऑगस्ट २०२६) :- हजरत मोहम्मद पैगंबर जयंती अर्थात ईद-ए-मिलाद निमित्त पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते पीएमपीएमएल मैदानापर्यंत बुधवारी (दि. २६ ऑगस्ट २०२६) मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीदरम्यान मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने पिंपरी, निगडी आणि चिखली वाहतूक विभागाच्या हद्दीत दुपारी १२ ते रात्री १२ वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद करून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
मिरवणूक पुढे जाईल त्याप्रमाणे निर्बंध लागू राहतील. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना आवश्यकतेनुसार अपवाद करण्यात येणार आहे.
पिंपरी वाहतूक विभागातील बदल…
१. महावीर चौक : चिंचवडकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे सर्व्हिस रोडने जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी.
पर्यायी मार्ग : डी-मार्ट ग्रेड सेपरेटरमार्गे इच्छितस्थळी जाता येईल.
२. डेअरी फार्म ग्रेड सेपरेटर : नाशिक फाट्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे सर्व्हिस रोडने येणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी.
पर्यायी मार्ग : डेअरी फार्म ग्रेड सेपरेटर इन व एच.पी. पंप खराळवाडी ग्रेड सेपरेटर इनमार्गे इच्छितस्थळी जाता येईल.
३. पिंपरी पूल : स्व. इंदिरा गांधी पूल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी.
पर्यायी मार्ग : मोरवाडी चौकमार्गे इच्छितस्थळी जाता येईल.
४. नेहरूनगर चौक : नेहरूनगर चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी.
पर्यायी मार्ग : एच.ए. कॉर्नर बसस्टॉप येथून मासुळकर कॉलनीमार्गे जाता येईल.
५. जय मल्हार खानावळ : सम्राट चौक ते मोरवाडी चौक जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी.
पर्यायी मार्ग : सम्राट चौक, ऑटो क्लस्टर मार्ग, मदर तेरेसा ब्रिज, बसवेश्वर चौक, जुना मोरवाडी कोर्ट किंवा केएसबी मार्गे जाता येईल.
६. सायन्स पार्क : सायन्स पार्क ते मोरवाडी चौक जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी.
पर्यायी मार्ग : ऑटो क्लस्टर, मदर तेरेसा ब्रिज, बसवेश्वर चौकमार्गे जाता येईल.
७. क्रोमा शोरूम : क्रोमा शोरूम ते गोकुळ हॉटेल जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी.
पर्यायी मार्ग : क्रोमा शोरूम-पिंपरी पूल-भाटनगर मार्गे इच्छितस्थळी जाता येईल.
८. आंबेडकर चौक पिंपरी : आंबेडकर चौकातून पिंपरी पूलमार्गे भाटनगरकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी.
पर्यायी मार्ग : मोरवाडी चौकमार्गे पिंपरी पूल व भाटनगर मार्गे जाता येईल.
निगडी वाहतूक विभागातील बदल…
९. भक्ती-शक्ती चौक : जुना मुंबई-पुणे महामार्ग सेंट्रल चौकातून भक्ती-शक्ती चौक सर्कलकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी.
पर्यायी मार्ग : सेंट्रल चौक-भक्ती-शक्ती ओव्हरब्रिजकडून रुद्रा पार्किंग ग्रेड सेपरेटरमार्गे पुण्याच्या दिशेने जाता येईल.
१०. अंकुश चौक : अंकुश चौकातून भक्ती-शक्ती सर्कलकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी.
पर्यायी मार्ग : अंकुश चौकातून भक्ती-शक्ती ब्रिजखालून अप्पुघरमार्गे जाता येईल.
११. भक्ती-शक्ती सर्कल : टिळक चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी.
पर्यायी मार्ग : उजवीकडे वळून काचघर चौक-भेळ चौकमार्गे किंवा डावीकडे वळून अंकुश चौक-चिखली चौक-त्रिवेणीनगर चौकमार्गे इच्छितस्थळी जाता येईल.
१२. टिळक चौक : टिळक चौकातून खंडोबामाळ चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी.
पर्यायी मार्ग : डावीकडे वळून दुर्गा चौक-थरमॅक्स चौकमार्गे किंवा उजवीकडे वळून लोकमान्य हॉस्पिटल-भेळ चौकमार्गे जाता येईल.
१३. स्वानंद डेअरी चौक : स्वानंद डेअरी चौकातून टिळक चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी.
पर्यायी मार्ग : दुर्गानगर चौक-अंकुश चौक-भक्ती-शक्ती ब्रिज अंडरपासमार्गे इच्छितस्थळी जाता येईल.
१४. रुद्रा पार्किंग पंक्चर : रुद्रा पार्किंग ग्रेड सेपरेटर आउट पंक्चरमधून सर्व्हिस रोडने खंडोबामाळ चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी.
पर्यायी मार्ग : ग्रेड सेपरेटरमधून सरळ पुण्याच्या दिशेने जाता येईल.
१५. फोर्स मोटर्स पंक्चर : फोर्स मोटर्स ग्रेड सेपरेटर आउट पंक्चरमधून सर्व्हिस रोडने खंडोबामाळ चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी.
पर्यायी मार्ग : फोर्स मोटर्ससमोरील ग्रेड सेपरेटरमार्गे पुण्याच्या दिशेने जाता येईल.
१६. खंडोबामाळ चौक : आकुर्डी गावठाण, दळवीनगर ब्रिज व थरमॅक्स चौकाकडून खंडोबामाळ चौकात येणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी.
पर्यायी मार्ग : थरमॅक्स चौकाकडील वाहतूक खडी मशीन वाय जंक्शन-परशुराम चौकमार्गे वळविण्यात येईल. आकुर्डी गावठाण व गणेश व्हिजनकडून येणारी वाहने थरमॅक्स चौकाकडे न जाता डावीकडे वळून टिळक चौकमार्गे इच्छितस्थळी जातील.
चिखली वाहतूक विभागातील बदल…
१७. कृष्णानगर चौक : कृष्णानगर चौकातून चेरी चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी.
पर्यायी मार्ग : थरमॅक्स चौक किंवा साने चौकमार्गे जाता येईल.
१८. जाधव सरकार चौक : जाधव सरकार चौकातून चेरी चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी.
पर्यायी मार्ग : छत्रपती शिवाजी महाराज चौक अथवा क्रांती चौकमार्गे जाता येईल.
१९. चिखली गाव चौक : चिखली गाव चौकातून डायमंड चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी.
पर्यायी मार्ग : नेवाळे वस्ती-साने चौकमार्गे जाता येईल.
२०. पिंगळे चौक : पिंगळे चौकातून पाटीलनगर पंचर-चिखलीकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी.
पर्यायी मार्ग : पिंगळे चौकातून उजवीकडे वळून नेवाळे कॉर्नरमार्गे इच्छितस्थळी जाता येईल.
२१. लक्ष्मी चौक : लक्ष्मी चौकातून रिव्हर व्ह्यू चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी.
पर्यायी मार्ग : लक्ष्मी चौकातून डावीकडे वळून शिवरोडमार्गे जाता येईल.
२२. केएसबी चौक : केएसबी चौकातून कुदळवाडी सर्कलकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी.
पर्यायी मार्ग :
– निगडीकडून येणारी वाहने केएसबी चौकातील अंडरपासने पुढे जाऊन यशवंतनगर चौकमार्गे जातील.
– भोसरीकडून येणारी वाहने अंडरपासने पुढे जाऊन एमआयडीसी कॉलनी चौकमार्गे जातील.
– पिंपरीकडून केएसबी ओव्हरब्रिजवरून येणारी वाहने शाहूनगर बसस्टॉप चौकातून डावीकडे वळून शाहूनगरमार्गे जातील.
२३. भैरवनाथ मंदिर, मोई : मोई गावातून डायमंड चौकाकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी.
पर्यायी मार्ग : मोई गावातून येणारी वाहने भैरवनाथ मंदिराजवळून यू-टर्न घेऊन मोई गावमार्गे इच्छितस्थळी जातील.
मिरवणूक जसजशी पुढे सरकेल, त्यानुसार वाहतूक निर्बंध आवश्यकतेनुसार लागू करण्यात येतील. वाहनचालकांनी आणि नागरिकांनी वाहतूक पोलिसांनी दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपआयुक्त (वाहतूक) विक्रांत देशमुख यांनी केले आहे.


















