- लोखंडी शेड, अँगल व ग्रील तुटलेल्या अवस्थेत…
- अपघाताची शक्यता, तातडीने दुरुस्ती करा – सचिन काळभोर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २५ ऑगस्ट २०२६) :- निगडी ते रावेत बीआरटी मार्गावरील ट्रान्सपोर्ट नगर येथील बीआरटी बसथांब्याची दुरवस्था झाली असून, तुटलेल्या लोखंडी शेड आणि ग्रीलमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित बसथांब्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे.
ट्रान्सपोर्ट नगर येथील बसथांब्याचे लोखंडी शेड तुटलेल्या अवस्थेत असून, लोखंडी अँगल आणि ग्रीलही खराब झाले आहेत. त्यामुळे बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना धोका निर्माण झाला असून, कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता आहे.
या संदर्भात पीएमपीएमएलच्या परिवहन व्यवस्थापन अधिकाऱ्यांसह पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. प्रशासनाने या गंभीर बाबीची तातडीने दखल घेऊन संबंधित बसथांब्याची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी काळभोर यांनी केली आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक भाग तातडीने दुरुस्त करून बसथांबा सुरक्षित करावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
















![[PCMC] भाजपच्या सात स्वीकृत नगरसेवकांची निवड पुन्हा रखडली!](https://newspcmc.com/wp-content/uploads/2026/11/images-1-2-190x122.jpeg)

