न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २५ ऑगस्ट २०२६) :- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप प्राथमिक विद्यालय, सांगवी (ता. हवेली, जि. पुणे) येथे आज, मंगळवार दिनांक २५ ऑगस्ट २०२६ रोजी फौजी बांधवांसाठी विशेष ‘रक्षाबंधन कार्यक्रम’ मोठ्या उत्साहात आणि भावुक वातावरणात पार पडला.
सीमेवर अहोरात्र पहारा देऊन देशवासीयांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थिनींनी उपस्थीत माजी व कार्यरत फौजी बांधवांचे औक्षण करून त्यांना स्वहस्ते तयार केलेल्या सुंदर राख्या बांधल्या त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या त्या राख्या विक्रीसाठी ठेवल्या होत्या त्यातून स्वाकमाईचा अनुभव घेतला. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.
राखी बांधल्यानंतर अनेक विद्यार्थिनींना व फौजी बांधवांना गहिवरून आले. “घरच्या बहिणीपासून दूर असताना सांगवीतील या लहान बहिणींनी दिलेल्या प्रेमामुळे घराची उणीव भासली नाही,” अशी भावना उपस्थित सैनिकांनी व्यक्त केली. या प्रसंगी सैनिकांनी विद्यार्थ्यांना देशाच्या सेवेचे महत्त्व पटवून दिले आणि अभ्यासात सातत्य ठेवून एक चांगला नागरिक बनण्याचे आवाहन केले.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. बोरकर प्रिया मॅडम आपल्या भाषणात सांगितले की, “सैनिकांच्या असीम त्यागामुळेच आपण सुरक्षित राहू शकतो. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी, हाच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.”
या कार्यक्रमास विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. बोरकर प्रिया मॅडम,शिक्षक श्री. ढोले नंदकिशोर सर,श्रीमती. गायकवाड वनिता, शेलार माधवी मॅडम, जाधव मनीषा मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने आणि उपस्थितांचे आभार श्री. नंदकिशोर ढोले सरांनी मानून कार्यक्रमाची सांगता झाली.


















