- बेकर ह्युज कंपनीतील घटना; दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ नोव्हेंबर २०२२) :- आपसात संगणमत करून बेकायदेशिरपणे फिर्यादीच्या बेकर ह्युज या कंपनीत येवून फिर्यादीला कंपनीमध्ये वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट द्या नाहीतर माथाडीचे काम म्हणून आम्हाला पैसे द्यावे लागतील, नाहीतर कोणतीही गाडी आत बाहेर करु देणार नाही, अशी धमकी देत पार्किंगमधील गाड्यांच्या ड्रायव्हर व लोकांना शिवीगाळ केली.
ही घटना (दि. २) रोजी दु. १२.४० ते ०२.०० वा. चे सुमारास मौजे बधलवाडी, नवलाख उंब्रे गावच्या हद्दीतील बेकर ह्युज कंपनीत घडला. फिर्यादी स्वप्नील नानासाहेब पवार (वय ३५ वर्षे, रा. यमुनानगर, निगडी) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपी राजेंद्र कडलग, ओमकार कोयते (दोन्ही रा. नवलाख उंब्रे ता. मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करीत आहेत.