न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ नोव्हेंबर २०२२) :- इस्कॉन, श्री गोविंद धाम मंदिराच्या वतीने आकुर्डी येथील संत बाबा मौनीसाहेब वृद्ध आनंद आश्रमात वृद्धांच्या आनंदासाठी सुश्राव्य भजन किर्तन आयोजित करण्यात आले. ग्रंथांची आरती करून दामोदर भगवंतांना दिपदान करण्यात आले.
श्री. गोपती प्रभु व रोहीणीकुमार प्रभु यांच्याद्वारे आश्रमवासीयांना प्रवचन व मार्गदर्शन करण्यात आले. आश्रमातील प्रत्येक सदस्यांना भगवदगीता व नामस्मरण साहित्य देण्यात आले. आश्रमसाठी सामुहीकरीत्या पुस्तक संच, श्रीमदभागवत ग्रंथ संच तसेच मासिक पत्रिकेचे आजीवन सभासदत्व हे आश्रमचे अध्यक्ष अशोक खौसला यांच्याकडे देण्यात आले. इस्कॉनच्या या उपक्रमात सर्व सदस्यांना दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आला. त्यानंतर उपस्थित सर्वांना अन्नदान प्रसाद वितरीत करण्यात आला. कार्यक्रममध्ये इस्कॉनचे सर्व सदस्यवृद्धांना मार्गदर्शन व त्यांची सेवा केली. या दान सोहळ्यामध्ये इस्कॉनचे अनेक साधक व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कार्यक्रमचे आयोजन, व्यवस्थापन व सुत्रसंचालन भारत संस्कृति विकास उपक्रमाचे प्रमुख जडभरत दासब्रह्मचारी यांनी केले. भारतीय संस्कृतिचे जतन व प्रचार, गोसेवा-गोरक्षा, ग्रंथ वितरण, समाज प्रबोधन, बालसंस्कार, सेंद्रिय शेती, ग्राम विकास, अनाथाश्रम-वृद्धाश्रम तसेच शहिद जवान परिवार सेवा, पिडित रूग्ण व समाज सेवा आदि उपक्रम राबविण्याचा विचार असल्याचे जडभरत दासब्रह्मचारी यांनी सांगीतले.
















