न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० नोव्हेंबर २०२२) :- बांधकाम चालु असलेल्या साईटच्या समोर मोकळ्या जागेत ठेवलेल्या एकुण ८३ लोखंडी सेंट्रींग प्लेट अज्ञात चोरटयाने चोरी करुन नेल्या आहेत. त्याची किंमत ९१,३०० रुपये एवढी होती.
हा प्रकार (दि. २६) रोजी रात्री ९.०० वा. ते (दि. २७) रोजी सकाळी ८.०० वा. चे दरम्यान वासुली गावच्या हद्दीत हनुमंत बापू शेळके यांच्या बांधकाम चालु असलेल्या साईटच्या समोरील मोकळ्या जागेत ता. खेड येथे घडला.
फिर्यादी गणेश पितांबर वाळुंज (वय ३५ वर्ष, रा. चांदुस, पो. किवळे ता. खेड जि.पुणे) यांनी आरोपी अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दिली आहे. चाकण महाळुंगे पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.