न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ एप्रिल २०२३) :- तेलंगना राज्यातुन गांजाची विक्री करण्यासाठी एकजण थेरगाव येथे येणार आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी थेरगाव चौकी समोरील कैलासनगरकडे जाणाऱ्या रोडवर सापळा रचून संशयित आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २४ किलो २२४ ग्रॅम वजनाच्या गांजासह एकुण ३,५०,००० रुपये किमतीचा मुददेमाल जप्त केला आहे. वाकड पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने ही कामगिरी केली.
राहुल सावन मलके (वय ३३ वर्षे, सध्या रा.एस २४/२५२ देवेंद्रनगर, गाजुल रामारम सिकंदराबाद तेलंगणा, मूळ रा. गल्ली नं.०९, नारेगाव, सिडको एमआयडीसी जि.संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर वाकड पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३२५/२०२३. एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २०(ब) (ii) (क) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपीची (दि. ६) पर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त असून चौकशी चालू आहे. आरोपीच्या संपर्कात पुणे व पिंपरी चिंचवडमधील कोण आरोपी आहेत? याबाबत तपास चालू आहे.
ही कारवाई विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मनोज लोहीया सह पोलीस आयुक्त, डॉ. संजय शिंदे अपर पोलीस आयुक्त, डॉ. काकासाहेब डोळे पोलीस उप आयुक्त परि २, श्रीकांत डिसले, सहा.पोलीस आयुक्त वाकड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यवान माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संतोष पाटील पोलीस निरीक्षक गुन्हे-१, रामचंद्र घाडगे पोलीस निरीक्षक गुन्हे-२, सपोनि. संतोष पाटील, सपोनि. संभाजी जाधव, पोउपनि सचिन चव्हाण, सपोफी. बिभीषण कन्हेरकर, सपोफी. बाबाजान इनामदार, सपोफी. राजेंद्र काळे, पोहवा वंदु गिरे, पोहवा. संदीप गवारी, पोहवा. दिपक साबळे, पोहवा. स्वप्निल खेतले, पोहवा. अतिश जाधव, पोहवा. प्रमोद कदम, पोना प्रशांत गिलबीले, पोना. अतिक शेख, पोना. विक्रांत चव्हाण, पोना. राम तळपे, पोशि. अजय फल्ले, पोशि. तात्या शिंदे, पोशि कोर्तेय खराडे, पोशि. भास्कर भारती, पोशि. स्वप्निल लोखंडे, पोशि. सौदागर लामतुरे, पोशि. विनायक घारगे, रमेश खेडकर, पोशि. सागर पंडीत (परि-०२ कार्यालय) यांनी मिळुन केली आहे.
















