न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२३) :- भारत मातेसाठी बलिदान देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची गौरव यात्रा महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात भाजपच्या वतीने व शिवसेनेला सोबत घेऊन मोठ्या उत्साहात निघत आहे, त्यातीलच एक भाग म्हणून पिंपरी विधानसभा क्षेत्रात रविवारी (दि. ९) रोजी ही यात्रा सायंकाळी पाच वाजता आकुर्डी खंडोबा मंदिरापासून आकुर्डी गाव मार्गे दत्तवाडी विठ्ठल मंदिरा पर्यंत अत्यंत दिमाखात काढण्यात आली.
भारत मातेचे पूजन करून यात्रेची सुरुवात शहराध्यक्ष आ. महेश लांडगे, आ. उमा खापरे, सदाशिव खाडे, अमर साबळे, एकनाथ पवार, अमित गोरखे, राजेश पिल्ले, मिलिंद देशपांडे, हेमंत हरहरे, नितीन वाटकर यांनी केली.
या यात्रेसाठी वीर सावरकरांचा भव्य व अत्यंत देखणा रथ बनवण्यात आला होता. वीर सावरकरांची गाणी वाजवत असलेला बँड यामुळे या रॅलीमध्ये वातावरण अत्यंत देश प्रेमी झाले होते. ढोल ताशा पथक त्याचबरोबर महिलांनी बांधलेले भगवे फेटे व पुरुषांनी घातलेल्या भगव्या फेट्या व उपर्णे यामुळे अत्यंत शिस्तबद्ध अशी भव्य दिव्य मिरवणूक आकुर्डी गावातून पहिल्यांदाच निघाली. टाळ मृदुंग असलेले वारकरी पथक अत्यंत जल्लोषात या यात्रेत सामील झाले होते. व्यापारी मंडळींनी सावरकरांच्या रथावर ठिकठिकाणी थांबून पुष्पवृष्टी केली. तीन किलोमीटरच्या या यात्रेमध्ये एक हजार पेक्षा जास्त नागरिक कार्यकर्ते व सावरकर प्रेमी उत्साहात सहभागी झाले होते.
भरत आमदापुरे यांचे वीर सावरकर या विषयावरील व्याख्यानाने या यात्रेची सांगता करण्यात आली. यात्रा यशस्वी होण्यासाठी आ. उमा खापरे ,अमित गोरखे, सदाशिव खाडे, अनुप मोरे, केशव घोळवे, संदीप वाघेरे, माऊली थोरात, सुजाता पलांडे, कैलास कुटे, प्रमोद कुटे, उर्मिला काळभोर, सुप्रिया चांदगुडे, अमोल थोरात, माऊली थोरात, संजय मंगुडेकर, गणेश लंगोटे, समीर जावळकर, अतुल इनामदार, महेंद्र बाविस्कर, सोनाली हिंगे, अनुराधा गोरखे, संदीप वाघेरे, आर एस कुमार, जयेश चौधरी, मदन गोयल, महेश कुलकर्णी, तेजस्विनी कदम, प्रकाश जवळकर, देवदत्त लांडे, गणेश ढाकणे, कोमल शिंदे, कोमल काळभोर, प्रदीप बेंद्रे, नंदू भोगले, विजय शिनकर, माजी नगरसेवक शीतल शिंदे, सुरेश गदिया, रघुनाथ जवळकर, गोपाल केसवानी आदींनी सहभागी घेतला.
सावरकर गौरव यात्रा पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे यांनी सर्वांचे स्वागत केले.