न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ एप्रिल २०२३) :- निगडी प्राधिकरणातील फिर्यादीच्या राहत्या घरामधील टेरेसच्या दरवाज्याची फ्रेम कटावणीच्या सहायाने तोडुन अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला.
चोरटयाने रोख रक्कम, सोन्याचे दागिणे, कॅमेरा, अॅपल मॅकबुल प्रो १३ लॅपटॉप व घडयाळ असा एकुण ५,१५,००० रुपये किंमतीचा मुददेमाल घरफोडी करुन चोरुन नेला आहे. ही घटना (दि. १५) रोजी सायं ५.३० ते (दि. १७) रोजी सकाळी ११.०० वाजण्याच्या सुमारास घडली.
महिला फिर्यादीने अज्ञात चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. निगडी पोलिसांनी २६५/२०२३ भा.द.वि.सं.कलम ४५४,४५७,३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.