न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ एप्रिल २०२३) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुक कार्यक्रम पाहून फिर्यादीसह त्यांचा मित्र (दि. १६) रोजी रात्री १०. ०० वाजेच्या सुमारास प्रगती शाळा, महेशनगर, पिंपरी येथे थांबले होते. त्यावेळी आरोपी १ हा “तु माझ्याकडे का पाहतो” असे फिर्यादीला बोलला. फिर्यादी ‘तुला काही सोने लागले आहे का’, असे आरोपीला बोलले. त्यावरून आरोपी १ याने फिर्यादी यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली.
त्याच्या इतर साथिदारांना बोलावुन फिर्यादी यांना आरोपी ४ याने त्याच्या हातातील चामडी बेल्डने पाठीवर, आरोपी ६ याने गाडीची चावी फिर्यादीच्या पाठीवर मारुन जखमी केले. आरोपी ४ याने फिर्यादीस खाली पाडुन लाथा बुक्यांनी मारहाण केली. त्यावेळी फिर्यादी यांची आई ही भांडणे सोडवीण्यासाठी आली असता तीला देखील आरोपी ३ याने हाताने मारहाण केली. फिर्यादी तेथुन पळुन जात असताना गाडीवर आलेले इतर पाच ते सहा लोकांनी फिर्यादीस पकडुन पुन्हा खाली पाडुन लाथाबुक्यांनी मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी रुतिक राजेश सोरटे (वय २३ वर्षे, रा. नेहरुनगर, पिंपरी) यांनी आरोपी १ जैद महारुख शेख (वय अंदाजे १८ वर्षे, रा. पिंपरी), २ आसिफ महारुख शेख (वय अंदाजे २२ वर्षे), ३ शाहरुख मुद्रा शहा (वय अंदाजे ३० वर्षे), ४ इरफान शहा (वय अंदाजे २८ वर्षे), सुदर्शन कांबळे (वय अंदाजे १९ वर्षे), ५ रामा चौधरी (वय २४ वर्षे), ६ शाहनवाज मुन्ना शहा (रा. पिंपरी) व इतर पाच ते सहा इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी ४४० / २०२३भा.द.वि कलम ३२४.३२३,५०४,१४३१४५.१४७, १४९ नुसार गुन्हा दाखल करीत पाच जणांना अटक केली आहे.