न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ मे २०२३) :- पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, दिवाणी व फौजदारी न्यायालय पिंपरी व पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. यात २०६ प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.
मोरवाडी येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. नोटरी कुंडलिक गावडे तर अॅड. रामराजे भोसले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. न्यायाधीश एन. आर. गजभिये, न्यायाधीश एम.जी. मोरे, न्यायाधीश पी.सी. फटाले यांची प्रमुख उपस्थिती होती.
या लोकन्यायालयात दोन्ही पक्षकारांना बोलावून सामंजस्याने प्रलंबित प्रकरणे मिटविण्यात वकीलांना यश आले. त्यामुळे न्यायालयाचा तसेच पक्षकारांचा वेळ व पैसा वाचल्याबद्दल उपस्थितांनी सामधान व्यक्त केले. या लोकन्यायालयात अॅड. महेश गायकवाड, अॅड. हनुमंत तनपुरे व अॅड. मानसी उदासी यांनी पॅनल जज म्हणून कामकाज पाहिले. तर आकुर्डी यथील लोकन्यायालयात अॅड. मेरी रणभिसे यांनी पॅनल जज म्हणून कामकाज पाहिले.
यावेळी पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. नारायण रसाळ, उपाध्यक्ष अॅड. जयश्री कुटे, सचिव अॅड. गणेश शिंदे, महिला सचिव प्रमिला गाडे, ऑडिटर अॅड. राजेश रणपिसे, सभासद अॅड. अक्षय केदार, अॅड. प्रशांत बचुटे, अॅड. सुदाम साने, अॅड. विलास कुटे, अॅड. अरुण खरात, अॅड. अशोक बढेकर आदी उपस्थित होते. अॅड. जयश्री कुटे यांनी सूत्रसंचालन तर अक्षय केदार यांनी आभार मानले.


















