न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जून २०२३) :- ‘ माझ्याकडे का बघताय ‘ अशी फिर्यादीने आरोपीकडे विचारणा केली. त्याचा राग मनात धरुन आरोपी यांनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादीची पत्नी ही सदरचा वाद सोडविण्यासाठी मध्ये आली असता, तिला आरोपी यांनी धक्काबुक्की केली.
तसेच आरोपीच्या साथीदाराने लाकडी काठीने फिर्यादीच्या डाव्या हातावर, डोक्यावर मारहाण करुन फिर्यादीच्या डाव्या हाताचा पंजा फ्रेक्चर करुन फिर्यादीला गंभीर जखमी केले, असे फिर्यादित म्हटले आहे. ही घटना (दि. ३) रोजी रात्री ७.४५ च्या ‘सुमारास स्केच हॉटेल समोरील पार्किंगमध्ये, स्प्रिंग हॅली बिल्डींगजवळ, वडमुखवाडी येथे घडली.
फिर्यादी विवेक जगन्नाथ जाधव यांनी आरोपी राहुल तापकीर, कुंडलीक तापकीर व त्यांचे दोन अनोळखी साथीदार यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. दिघी पोलिसांनी २४६/२०२३ भा.द.वि. कलम ३२६.३२३, ५०४, ५०६, ३४ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (अ) सह १३५ अन्वये आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.











