न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जून २०२३) :- पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनच्या वतीने वकील बार रूममध्ये इयत्ता १० वी व १२ वी मध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्या र्थ्यांचा पिंपरी नेहरूनगर न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश वानखेडे तसेच न्यायाधीश गिरी, न्यायाधीश मोरे, न्यायाधिश गजभिये व बार असोसिएशनचे अध्यक्ष नारायण रसाळ, अध्यक्ष ॲड. दातीर पाटील, ॲड. सुहास पडवळ, ॲड. सुदाम साने, ॲड. विलास कुटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभाचे सूत्र संचालन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनच्या विदयमान उपाध्यक्षा ॲड. जयश्री विलास कुटे यांनी केले व सर्वांचे आभार ॲड. प्रशांत बचुटे यांनी मानले.
याप्रसंगी १० वी व १२ वी मध्ये उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झालेल्या निलांजन चंद्रकांत माने, तन्मय गजानन धायगुडे, जान्हवी विजय रोडे, श्रावणी विनोद काळभोर, निल सचिन राऊत, तनिष्का धमाजी लांडगे, नेहा दिलीप शिंगोटे, व्हिक्टोरिया बिटो जॉन, सिद्धेश जयदीप सिसोदिया, कार्तिक महेश भापकर, हर्षवर्धन वैभव मोहिते, श्रुती सत्यन नायर, निहिरा सुनील कडूसकर, दुरप्श| समशेर मोमीन, श्रेयस संभाजी कुंभार या सर्व विदयार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात वकिलांच्या गुणवंत मुलांचे सत्कार केल्याबद्दल न्यायाधीशांच्या वतीने बार असोसिएशनचे कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने बहुसंख्येने वकील बंधू भगिनी तसेच ॲड. अल्पना रायते व ॲड. अरुण खरात उपस्थित होते. तसेच सचिव ॲड. गणेश शिंदे, महिला सचिव ॲड. प्रमिला गाडे, सह सचिव ॲड. मंगेश नढे, हिशोब तपासनीस ॲड. राजेश रणपिसे, सदस्य ॲड. स्वप्नील वाळुंज, ॲड.सौरभ जगताप, ॲड. अक्षय केदार, ॲड. नितीन पवार, ॲड. पवन गायकवाड आदी उपस्थित होते.















