न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जून २०२३) :-पिंपरी येथील भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही योगा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विश्वास जाधव, कल्याणी फाळके, स्वप्नाली जाविर उपस्थीत होत्या.
त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील योगाच महत्त्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांकडून योगाची काही प्रात्यक्षिके करून घेतली. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य देशमुख, तसेच विद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेरतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक गर्जे यांनी केले. प्रास्ताविक सावळकर यांनी केले. पाहुण्यांची ओळख बी.बी.शिंदे यांनी करून दिली तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुर्वे यांनी केले. कार्यक्रम अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये पार पडला.















