न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जून २०२३) :- विविध खेळाच्या माध्यमांतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या चिंचवडच्या विकास शिक्षण मंडळ संचलित श्री. शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी योगासनातील आकर्षक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
संस्थेचे अध्यक्ष जगदीश जाधव हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. अध्यक्षांनी विद्यार्थ्यांना आणि सर्व उपस्थितांना आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. दैनंदिन जीवनात नियमित योग करून जीवन आरोग्यसंपन्न करण्याचा आणि योगाचे महत्व समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्याचा मौलिक संकल्प करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
याप्रसंगी संस्थेचे संचालक विजय जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ठ प्रात्यक्षिकांबद्दल विद्यार्थ्यांचे विशेष शब्दांत कौतुक केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळाराम पाटील, पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव, ज्येष्ठ शिक्षक किसन आहिरे, सुचित्रा झेंडे, प्रतीक्षा शिंदे, बालाजी मुंढे आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन क्रीडाशिक्षक शब्बीर मोमीन यांनी तर दत्तात्रय भालेराव यांनी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त केले.












