- छ. संभाजीनगर प्रमाणे पालिकेतील कंत्राटी कामगार आणि कंत्राटदारांचे ऑडीट करा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेत दहा हजारांहून अधिक कामगार कंत्राटी तत्वावर कार्यरत आहेत. पालिकेचे अधिकारी आणि बहुतांश लेबर काॅन्ट्रॅक्टर संगनमताने आणि सर्रासपणे कामगार कायदा धाब्यावर बसवुन कंत्राटी कामगार व मनपाची फसवणूक करीत आहेत.
कामगारांना दरमहा तसेच बंहुताश विभागात कामगारांना तीन-तीन महीने वेळेवर न पगार देणे, निर्धारित संख्येपेक्षा कमी कामगारांकडून काम करुन घेणे, कामगारांना नियुक्तीपत्र, ईएसआय, पीएफ, पगार स्लिप, किमान वेतन, वैद्यकीय सुविधा, अपघात विमा, गणवेश, सुरक्षा साधने, ओळखपत्र न देणे, बायोमेट्रिक हजेरीपत्रक न ठेवणे, कत्रांटी कामगारांना दंडात्मक वसुलीसाठी नेमणे (ज्यामुळे आर्थिक भ्रष्टाचारांची शक्यता असते), मनापाच्या कंत्राटी कामगारांकडून अधिकाऱ्याची घरची कामे करुन घेणे अशा प्रकारचा गैरप्रकार झाला असलेने तो उघडकीस आणण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कंत्राटी कामगार व त्यांचे कंत्राटदार यांचे कामकाज व आर्थिक बाबीचे ऑडीट करण्यात त यावे. कंत्राटी कामगारांचे संविधानिक हित जोपासणे हे मालक या नात्याने महापालिकेचे आद्यकर्तव्य आहे.
छ. संभाजीनगर (औरंगाबाद) मनपाच्या धर्तीवर कंत्राटी कामगार व त्यांचे कंत्राटदार यांचे सर्वकष ऑडीट करावे अशी मागणी भाजपा महाराष्ट्र कामगार सेलचे प्रदेश सरचिटणीस हनुमंत लांडगे यांनी इ-मेलद्वारे पालिका आयुक्तांकडे केली आहे.


















