न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जून २०२३) :- पत्सर दुचाकीवरून फिर्यादी यांचा मावस भाऊ (दि. २७) रोजी १०.०० च्या सुमारास साईलिला सोसायटी समोरील सार्वजनिक रस्त्यावरील मोशी आळंदी रोडने जात होता. त्यावेळी दगडाने भरलेला हायवा डंपर वरील आरोपी चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हयगयीने, बेदरकारपणे वेगाने चालवुन दुचाकीला पाठीमागुन डाव्या बाजुने धडक दिली.
त्यात हायवाच्या मागच्या टायरखाली येवुन डोक्यास तोंडास व पोटास गंभीर दुखापत होवुन फिर्यादी यांचा मावस भाऊ संतोष सुभाष वाघमारे यांचा मृत्यू झाला. आरोपी चालक त्याच्या मृत्यूस कारणीभुत झाला आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
फिर्यादी किशोर मोहन वाघमारे यांनी आरोपी हायवा डंपरवरील चालक सुरेश भुजंगा कचरे याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी २७५/२०२३ भा. दं.वि. कलम ३०४ (अ), २७९, मो. वाहन कायदा कलम १८४,११९/१७७ प्रमाणे आरोपिवर गुन्हा दाखल केला आहे.












