- तीन सराईत गुन्हेगारांना पुनावळेतून पिस्टल व रांऊडसह अटक..
- पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जून २०२३) :- पुनावळे येथील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी तिघांना खंडणी विरोधी पथकाने जेरबंद केले आहे. गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने पुनावळे येथील स्मशानभुमी येथे आरोपी येणार असून, त्यांच्याकडे पिस्टल आहे, अशी माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. पोलिसांनी सापळा लावून (दि. २४) रोजी आरोपींना अटक केली.
किशोर बापू भोसले (वय ३१ रा. पुनावळे गावठाण), अमित दत्तात्रय पाटुळे (वय २३ रा. शिंदेवस्ती चौक, रावेत) असे अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातुन १ देशी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतुसे (राऊंड) जप्त करण्यात आले. रावेत पोलीस ठाण्यात रजि नंबर २६८ / २०२३, आर्म अॅक्ट कलम ३ (२५). महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तपास दरम्यान आरोपींनी पिस्टल व राऊंड अमोल उर्फ धनज्या गजानन गोरंगले (रा. पुनावळे गावठाण) याच्या सांगण्यावरून तडीपार आरोपी रविराज उर्फ कन्नड्या राजेंद्र केदार याच्याकडून आणले असल्याचे सांगितले. खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी व अमलदार यांनी तात्काळ अमोल उर्फ धनज्या गजानन गोरगले याचा शोध घेवुन त्याला तात्काळ अटक केली. माथाडीच्या कामावरुन झालेल्या वादातून ठराविक उद्देश साध्य करण्याचे हेतूने आरोपी अमोल गोरगले याने साथीदारांकरवी पिस्टल व राऊंड आणले असल्याचे निष्पन्न झाले. अटक आरोपी हे पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून हिंजवडी व वाकड पोलीस ठाण्यात त्यांच्यावर दरोडा, खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत करणे असे गुन्हे दाखल आहे.
ही कारवाई मा. विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. डॉ. संजय शिंदे पोलीस सहआयुक्त, मा. वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, मा. स्वप्ना गोरे, पोलीस उप- गुन्हे, मा. सतिश माने, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली अरविंद पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, सहा पोलीस उप-निरीक्षक अशोक दुधवणे, अमर राऊत तसेच खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार प्रदीप गोडांबे, आशिष बोटके, रमेश मावसकर, किरण काटकर, सुनिल कानगुडे, प्रदीप गायकवाड, रमेश गायकवाड, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, सुधीर डोळस यांचे पथकाने केली आहे.
या गुन्हयाचा पुढील तपास खंडणी विरोधी पथकाचे सपोनि उध्दव खाडे हे करीत आहेत.












