- नागरिकांना सूचना व हरकतींसाठी आवाहन; हा आहे पर्यायी मार्ग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जून २०२३) :- वाहतुक विभागाच्या हद्दीमध्ये कावेरीनगर अंडरपास जवळुन पवारनगरमध्ये जाण्या-येण्यासाठी अरुंद रस्ता आहे. तसेच त्या रस्त्याने आतमधील ३-४ गल्लीमध्ये जाण्यासाठी त्याच रस्त्याचा नागरीक वापर करतात. पवारनगर गल्ली क्र १ च्या सुरवातीस वाहने पार्क झाल्यामुळे त्या ठिकाणी वाहतुक कोंडी निर्माण होते.
वाकड वाहतुक विभाग अंतर्गत पवार नगर गल्ली नं १ सुरुवातीस रस्त्याच्या दोन्ही बाजुस काका वडेवाले व यशराज हेअर सलुन समोर ५० मिटर पर्यंत ‘नो पार्किंग’ करण्यात येत आहे.
तसेच हा अंडरपास अरुंद असून १६ नंबरकडून काळेवाडी फाटयाकडे जाणाऱ्या सव्हिस रोडची रुंदी खुपच कमी आहे. तसेच त्या ठिकाणावरून पवारनगर गल्ली व थेरगावकडे जाणारी लेन असल्याने सतत वाहतूक कोंडी निर्माण होत असते. त्यामुळे कावेरीनगर सब वे मधुन दुचाकी, रिक्षा खेरीज इतर सर्व वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग :- कावेरीनगर वेणुनगरकडून काळेवाडी फाट्याकडे जाणारी वाहन गुजरनगर अंडरपास येथून इच्छित स्थळी जातील. १६ नंबरकडून वेणुनगर, कावेरीनगरकडे जाणारी वाहन काळेवाडी फाटा येथून यु-टर्नघेवून इच्छित स्थळी जातील.
नागरिकांनी याबाबत आपल्या काही सूचना असल्यास त्या पोलीस उपआयुक्त, वाहतूक शाखा पिंपरी चिंचवड कार्यालयात २५ जून ते ९ जुलैपर्यंत लेखी स्वरूपात कळवाव्यात. नागरिकांच्या सूचना व हरकतींचा विचार करून अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहीका, इ.) वगळून अंतिम आदेश काढण्यात येईल, असे वाहतूक विभागाने आदेशात म्हटले आहे.












