न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑक्टोबर २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम महाळुंगे, बालेवाडी, पुणे (बालेवाडी स्टेडियम) येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन माजी ऑलिंपियन खेळाडू बाळकृष्ण आकोटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्रीडा अधिकारी अनिता केदारी व क्रीडापर्यवेक्षक, क्रीडा शिक्षक उपस्थित होते.













