न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑक्टोबर २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अस्थायी अस्थापनेवर शिकाऊ उमेदवार (Apprenticeship) म्हणून १ वर्ष कालावधी करीता सन २०२३-२०२४ साठी मनपाच्या अधिकृत वेबपोर्टल www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर (मुख्य पृष्ठ – आमच्याबद्दल – नोकरीविषयक-शिकाऊ उमेदवार नेमणूक सन २०२३-२४) पिंपरी चिंचवड मनपाच्या औद्योगिक प्रशिक्षण विभागामार्फत (दि. ३०) रोजी सविस्तर जाहिरात प्रसिध्द करणेत आली आहे.
शिकाऊ/शिक्षु उमेदवार करीता मनपाच्या विविध विभागात कोपा-पासा, इलेक्ट्रिशियन, वायरमन, रेफ्रिजेरेशन अँड वातानुकुलन मेकॅनिक , प्लंबर, D.T.P, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, इंस्ट्रुमेंट मेकॅनिक, Draughtsman Civil, सर्व्हेअर व मेकॅनिक मोटार व्हेईकल इत्यादी ११ व्यवसायाच्या एकूण ३०३ जागा आरक्षणनिहाय उपलब्ध आहे. यासाठी मागील तीन वर्षात आय.टी.आय उत्तीर्ण झालेले प्रशिक्षणार्थी ऑनलाईन apply करु शकतात.
इच्छुक उमेदवारांना मनपा पोर्टलवरील जाहिरात प्रकटनाच्या अनुषंगाने दिनांक ७/११/२०२३ पर्यंत apprenticeshipindia.gov.in (NAPS PORTAL) या संकेतस्थळावर ऑनलाईन apply करणे आवश्यक राहील.














