न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. ०१ नोव्हेंबर २०२३) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च दरम्यान, तर दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च दरम्यान होणार आहे.
परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक गुरुवारपासून (२ नोव्हेंबर) उपलब्ध होणार आहे. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
परीक्षेपूर्वी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाकडे छापील स्वरुपात देण्यात आलेले वेळापत्रक अंतिम असेल. छापील वेळापत्रकावरून विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी, असेही मंडळाने स्पष्ट केले.