न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ नोव्हेंबर २०२३) :- पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनची निवडणुक नुकतीच पिंपरीतील नेहरूनगर न्यायालयात पार पडली. या निवडणुकीत नवनिर्वाचीत कमिटीमध्ये सहा सदस्य बिनविरोध तर सहसचिव बिनविरोध निवडुन आले. निवडुन आलेल्या उमेदवांना निवडीचे प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम वकिल बार रूममध्ये करण्यात आला.
त्यावेळी पिंपरी नेहरूनगर न्यायालयाचे प्रिंसीपल न्यायाधीश वानखेडे, न्यायाधीश गिरी, न्यायाधीश मोरे, न्यायाधीश गजभिये, न्यायाधीश फटाले तसेच मोठ्या प्रमाणात वकिल बांधव उपस्थीत होते.
या निवडणुकिचे कामकाज निवडणुक आधिकारी म्हणुन बार चे माजी अध्यक्ष ॲड.संजय दातीर पाटिल, ॲड.सुभाष चिंचवडे, ॲड.विलास कुटे, ॲड.अनिलकुमार तेजवानी, ॲड.सुहास पडवळ, ॲड, देवराम ढाळे, ॲड उत्तम चिखले, ॲड.सुशील मंचरकर, ॲड विजय शिंदे यांनी व्यवस्थित व शांततेत पार पाडले. त्यानिमित्त नवनिर्वाचित कमिटीद्वारे त्यांना सन्मानचिन्ह व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
अध्यक्ष पदासाठी दोन उमेदवार रिंगणात होते. त्यात विजयी उमेदवार ॲड. रामराजे भोसले यांना ४६८ मते तर ॲड. पांडुरंग शिंनगारे यांना २४० मते मिळाली. उपाध्यक्ष पदाकरिता यावेळी दोन महिला वकिल रिंगणात होत्या. त्यामध्ये विजयी उमेदवार ॲड. प्रतिक्षा खिलारी यांना ३९८ तर ॲड. कांता गोर्डे यांना ३०२ मते मिळाली. सचिव पदाकरितासुध्दा दोन उमेदवारांमध्ये लढत होती. यामध्ये विजयी उमेदवार ॲड. धनंजय मगन कोकणे यांना ४४८ तर ॲड. सागर भाऊसाहेब अडागळे यांना २६४ मते मिळाली. महिला सचिव पदासाठी दोन उमेदवार रिंगणात होत्या. यामध्ये १२ मतांनी ॲड. मोनिका सचवानी विजयी झाल्या. त्यांना ३५८ मते व ॲड. संगिता कुशाळकर यांना ३४७ मते मिळाली.
पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनची नवनिर्वाचित कार्यकारिणी खालीलप्रमाणे –
ॲड. रामराजे गोरक्ष भोसले – अध्यक्ष
ॲड. प्रतिक्षा सुरेश खिलारी – उपाध्यक्ष
ॲड. धनंजय मगन कोकणे – सचिव
ॲड. मोनिका लखीचंद सचवाणी – महिला सचिव
ॲड. उमेश राम खंदारे – सह-सचिव
ॲड. अजित प्रदीप खराडे – खजिनदार
ॲड. संदीप भाऊसाहेब तापकीर – हिशोब तपासणीस
ॲड.दशरथ विकास बावकर – सदस्य
ॲड. दर्षले राजू मीनल – सदस्य
ॲड.स्वाती दादा गायकवाड – सदस्य
ॲड.अस्मिता रघुनाथ पिंगळे – सदस्य
ॲड. अय्याज बाबा शेख – सदस्य
ॲड.फारुख अन्वरअली शेख – सदस्य














