न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ नोव्हेंबर २०२३) :- पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पोलीस कल्याण निधी अंतर्गत प्रत्येकी पोलीस अमलदार आणि अधिकाऱ्यांना पाच किलो साखरेचे वाटप केले आहे. यामुळे पोलीस आयुक्तालयातील पोलीस अंमलदार आणि पोलीस अधिकारी यांची दिवाळी गोड झाल्याचं बोललं जात आहे.
पोलीस आयुक्तालयातील साडेचार हजार पोलिसांना पोलीस कल्याण निधीमधून पाच किलो साखरेच वाटप केले. पोलीस आयुक्तांच कौतुक होताना दिसत आहे. याआधी असा उपक्रम राबविण्यात आलेला नव्हता. असाही उपक्रम राबवून पोलिसांच मनोबल वाढवू शकतो असा संदेश पोलीस आयुक्तांनी दिला आहे असं म्हणावं लागेल.