न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ नोव्हेंबर २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील इमारत व जमिनीवर कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत मालमत्ता कराची आकारणी व वसूली कार्यवाही करणेत येते. मे. स्थापत्य कन्सल्टंट प्रा.लि. यांच्यामार्फत महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्तांचे सर्वकष सर्व्हेक्षण सुरु करणेत आले आहे. सर्व्हेक्षणामध्ये आकारणी न झालेल्या मालमत्ता आकारणीच्या कार्यकक्षेत आणून शहरातील सर्व मालमत्तांना सुलभ क्रमांक देणे व नागरिकांचे मालमत्तेची माहिती अद्ययावत करण्यात येणार आहे.
केंद्र शासनाचे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने देशातील सर्व महानगरपालिकांना महापालिका हद्दीतील मालमत्तींना UPIC (Unique Property Identification Code) आयडी देणेबाबत सूचना केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने मालमत्ता सर्व्हेक्षणात इमारतींना व त्यामधील मालमत्तांना सुलभ क्रमांक देणेत येऊन UPIC आयडी क्रमांक देणेत येणार आहे. नागरिकांना मालमत्ता सर्व्हेक्षणाचे अनुषंगाने खालील सुविधा व सेवा यांचा लाभ होणार आहे.
1) मालमत्तांना UPIC आयडी दिल्यामुळे भविष्यात महानगरपालिकेच्या सर्व सेवा तसेच शासनाचे इतर विभाग यांच्यात समन्वय राहण्यासाठी उपयुक्त होणार आहे.
2) नागरिकांना ‘डिजी लॉकरच्या धर्तीवर मालमत्तेसंदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे प्रॉपर्टी लॉकरच्या माध्यमातून सुरक्षित ठेवण्याची सुविधा यामध्ये असणार असून त्यांचे मालमत्ते संदर्भातील सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
3) सर्व्हेक्षणामध्ये मालमत्तेची अचूक मोजणी करून माहिती व पत्ता अद्ययावत करणेत येणार आहे.
4) मालमत्तेची विश्वासर्हता वाढून खरेदी / विक्री व्यवहार मुलभ होण्यास मदत होईल.
5) मालमत्ता कर आकारणी बाबत संपूर्ण माहितीचे संकलन करून मालमत्ते अंतर्गत असणाऱ्या रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर पॉवर, घनकचरा विलगीकरण आदी सुविधा, नागरिकांची डिजिटल गोपनियता जपली जाणार असून आपली कागदपत्रे महापालिकेला सार्वजनिक करण्याचा व न करण्याचा अधिकार नागरिकांकडेच असणार आहे











