न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ नोव्हेंबर २०२३) :- एटीएम मशिनच्या उघड्या दरवाजातुन दोघांनी एटीएममध्ये प्रवेश केला. स्कु ड्रायव्हर व लोखंडी पट्टीच्या सहाय्याने एटीम मशिनमधील पैशाची चोरी करण्याचा प्रयत्न केला.
हा प्रकार (दि. २४) रोजी पहाटे १.४० च्या सुमारस SBI बँकेचे एटीएम सेन्टर, संत तुकारामनगर, पिंपरी येथे उघडकीस आला. फिर्यादी भागवंत ओमप्रकाश मुळे यांनी आरोपी १) रोहित विजय बहादुर सिंग (वय २३ वर्षे, रा. उत्तरप्रदेश), २) विधी संर्घषीत बालक यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे.
पिंपरी पोलिसांनी ११४०/२३ भा.दं.वि कलम ३८०,५११,४२७,३४ नुसार दोघांवर गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे. पोउपनि निळकंठ पुढील तपास करीत आहेत.












