न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ नोव्हेंबर २०२३) :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हाच्या वतीने शनिवारी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी पक्षाच्या शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, शहर मुख्य संघटक अरुण बोऱ्हाडे, ज्ञानेश्वर कांबळे, गोरक्ष लोखडे, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष संजय औसरमल, महिला कार्याध्यक्षा उज्वला ढोरे, सामाजिक न्याय महिला अध्यक्षा गंगा धेंडे, झोपडपट्टी विभाग अध्यक्ष संतोष निसर्गंध, खजिनदार दीपक साकोरे, उपाध्यक्ष संदीपान झोंबाडे, उत्तर भारतीय सेल अध्यक्ष लाल मोहंम्मद चौधरी, कामगार सेल कार्याध्यक्ष युवराज पवार, उपाध्यक्ष तुकाराम बजबळकर, गोरोबा गुजर, युवक सरचिटणीस निखिल घाडगे, सरचिटणीस बी.के.कांबळे, उपाध्यक्ष रामकिसन माने, महिला उपाध्यक्षा विजया काटे, खंडू पवार, उपाध्यक्ष कुमार कांबळे, उपाध्यक्ष संपतराव पाचुंदकर, शौल कांबळे, कार्यालयीन संपर्क प्रमुख धनाजी तांबे, सुनील अडागळे इत्यादी पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांविषयी कृतज्ञता व्यक्त करून सांगितले की, पिंपरी चिंचवड शहराच्या औद्योगिक विकासला त्यांनी चालना दिली म्हणून हे शहर नावारूपाला आले आहे. संविधान दिनानिमित्त ॲड. गोरक्ष लोखंडे यांनी संविधानातील प्रस्ताविकेचे वाचन केले.














