न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० नोव्हेंबर २०२३) :- लाठया, काठया, चाकु, सुरे, भाले, सोटे, बंदुका यासारखी घातक शस्त्रे जवळ बाळगण्यास मनाई असताना आरोपीने आदेशाचा भंग केला. स्वतःच्या ताब्यात १५,००० रु किंमतीचे लोंखडी सिल्वर रंगाचे जुने गावठी पिस्टल व ६०० रु किं चा एक पितळी राउंड जवळ बाळगला.
हा प्रकार (दि. २९) रोजी रात्री ८.१० च्या सुमारास पंजाबी हॉटेल समोर, वाल्हेकरवाडी-रावेत रोडच्या कडेला, वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे उघडकीस आला. अभिजीत भारत शिंदे (वय २२ वर्षे, चिंचवडेनगर) असे अटक आरोपीचे नाव आहे.
त्याच्यावर चिंचवड पोलीस ठाण्यात ५९०/२०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलीसकायदाकलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश मोरे पोउपनिरीक्षक पुढील तपास करीत आहेत.