- या वेळेत अशी वळवली वाहतूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० नोव्हेंबर २०२३) :- पिंपरी चिंचवड शहरात (दि. ०३) रोजी इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान जनजागृती अंतर्गत सकाळी ०६.०० ते सकाळी १०.०० वा या वेळेत रिव्हर सायक्लोथॉन या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे भोसरी वाहतुक विभागांतर्गत वाहतुकीत तात्पुरते आवश्यकतेनुसार बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उप-आयुक्त बापू बांगर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
पुणे नाशिक महामार्गावरुन चाकणकडे जाणाऱ्या वाहनांना बाबर पेट्रोलपंप ते भोसरी ओव्हरब्रिजव्दारे पांजरपोळ चौकापर्यंत जाण्यास प्रवेशबंदी केली आहे. सदरची वाहने बाबर पेट्रोलपंप चौकातुन नाशिक पुणे लेनवरुन डाव्या बाजूने पांजरपोळ चौकात जातील.
भोसरी ब्रिजखाली कै. अंकुशराव लांडगे सभागृह ते धावडे वस्तीकडे पुणे नाशिक महामार्गावर जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी असून सदरची वाहने यु-टर्न घेवून गुडविल चौकात जावुन परत यु-टर्न घेवुन बाबर पेट्रोलपंप येथे नाशिक पुणे लेनवरुन डाव्या बाजूने इच्छितस्थळी जातील.
पांजरपोळ चौक ते कृष्णानगर चौक ग्रेड सेपरेटर मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी असून सदरची वाहने कृष्णा नगरकडुन पांजरपोळकडे येणाऱ्या ग्रेड सेपरेटर मार्गावरुन सरदार चौकापर्यंत जावून इच्छित स्थळी जातील.
सरदार चौक ते क्रांती चौक दोन्ही बाजुस येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीस प्रवेशबंदी असून सदर मार्गावरील वाहने चौकातील इतर पर्यायी मार्गाने इच्छित स्थळी जातील.
कृष्णानगर चौक ते स्पाईनरोड चौक ग्रेड सेपरेटर मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी असून सदर मार्गावरील वाहने सर्व्हिस रोडव्दारे इच्छितस्थळी जातील.
चिखली ओव्हरब्रिज येथुन क्रांती चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी असून सदर मार्गावरील वाहने ओव्हरब्रिजवरील इतर मार्गाने इच्छित स्थळी जावे.
स्पाईन चौक ते अनुकुल चौक जाणाऱ्या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी असून सदर मार्गावरील वाहने एमआयडीसी चौकाकडून टेल्कोरोड मार्गे इच्छित स्थळी जातील.
अनुकुल चौक ते भोसरी फायर ब्रिगेडकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी असून सदर मार्गावरील वाहने नेहरुनगर हॉकी स्टेडीयम मार्गे इच्छित स्थळी जातील.
भोसरी फायर ब्रिगेड ऑफिस ते गावजत्रा मैदानकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंद करण्यात आला आहे. सदर मार्गावरील वाहने भोसरी चांदणी चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
५ कि.मी. सायकल रॅली मार्ग गावजञा मैदान-लांडगे पेट्रोलपंप-इंद्रायणीनगर व परत गावजत्रा मैदान या मार्गावरील वाहतुक टप्याटप्याने चालु बंद करण्यात येईल. सर्व चौकातील वाहतूक आवश्यकतेनुसार सायकल रॅली मार्गावर असलेल्या टप्याटप्याने चालू-बंद करण्यात येईल, असे पत्रकात म्हटले आहे.