न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ डिसेंबर २०२३) :- प्राधिकरणातील गदिमा सभागृहात शनिवारी जुन्या मराठी हिंदी गाण्याच्या कार्यक्रमाचे स्वरा मुजिकल्सच्या वतीने अॅड. शोभा कदम यांनी आयोजन केले. त्यास प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. टाळ्यांचा कडकडाट आणि वन्स मोरची मागणी यात अतिशय मधुर सुरातील गीतांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता आला.
सी ए विनोद इनामदार, तरूणकुमार शर्मा, शशिकांत नलावडे, गोपाळ कोकाटे, शोभा कदम, मीरा भावे, वैजयंती पाटील, माधुरी हरमकर आणि वेरोनिका चार्ली व अतुल इनामदार आणि सीमा खैरनार हे या कार्यक्रमाचे विशेष आमंत्रित होते. त्यांनी उत्कृष्ट गाणी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. यापुढील सर्व कार्यक्रमांना सर्वोतोपरी विशेष सहकार्य करण्याचे आश्वासन अतुल इनामदार यांनी दिले.
कार्यक्रमाची सुरुवात हे चिंचेचे झाड, शोधू कुठे प्रिये तुला, रोते हुए आते सब, आजा सनम मधुर चांदणी या गीतांनी झाली तर मध्यंतरानंतर ओ मेरी झोहरजाबी जबी, रोते हुये आते है सब, औंर इस दिल में क्या रखा है, यारी है इमान मीरा यार मेरी जिंदगी, मनाच्या धुंदीत, मळ्याच्या माळ्यामध्ये ,हर किसीको नहीं मिलता प्यार, रोते हुए आते है सब, कितना प्यारा वादा, सांग कधी कळणार तुला, कजरा मोहबतवाला या गीतांना तर वन्स मोअर देऊन रसिकांनी कार्यक्रमाचा मनमुरादपणे आनंद लुटला
सुरमयी शाम या कार्यक्रमाची निर्मिती आणि संकल्पना स्वरा मुजिकल्सच्या कदम यांनी असून परिसरातील नवोदित गायकांना संधी उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निराली मांकड यांनी केले. कार्यक्रमास ध्वनी संयोजन राजेंद्र किरवे, व्हिडिओ विक्रम क्रीअशन, जाहिरात नागन्ना झलकी आणि फोटोग्राफी अमित काळे याचे सहकार्य लाभले.













