न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ डिसेंबर २०२३) :- संघटनेच्या कार्यालयात खजिनदार म्हणुन मानधनावर काम करीत असताना आरोपीने फिर्यादीच्या संघटनेचे बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यातुन ऑनलाईन पध्दतीने एकुण १६,०८,०१९ रूपये परस्पर स्वतःच्या बँक खात्यावर व इतर व्यक्तीचे बँक खात्यावर ट्रान्स्फर करीत संघटनेचे अध्यक्ष म्हणुन फिर्यादी व त्यांचे राष्ट्रीय श्रमीक संघटनेतील पदाधिकारी व सदस्य यांचा विश्वासघात करुन फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार सप्टेंबर २०२२ ते दि.०८/१२/ २०२३ रोजीपर्यंत राष्ट्रीय श्रमीक आघाडी संघटनेचे कार्यालय, संत तुकाराम नगर, पिंपरी येथे घडला. फिर्यादी यशवंत आनंदराव भोसले यांनी आरोपी हेमंत विलास माने याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी पिंपरी पोलीस ठाण्यात ११९२/२०२३ भा.दं.वि कलम ४०८,४२० नुसार गुन्हा दाखल केला असून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. पोउपनि जिनेडी पुढील तपास करीत आहेत.












