न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ डिसेंबर २०२३) :- बीव्हीजी कंपनीकडून पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात आरोपी कामास आहे. तो रुग्णालयात कॅश काउंटरचे आणि कॅश स्विकारण्याचे काम करीत होता. रक्त पेढी विभाग, एक्स रे विभाग, सोनोग्राफी विभाग, शव गृह विभाग या विभागातील हॉस्पीटलने निश्चित केलेल्या रक्कमेच्या पावत्या आरोपीने एडीट करुन बनावट पावत्या तयार केल्या.
रुग्ण नातेवाईक यांना निश्चित केलेल्या रक्कमेप्रमाणे देवून त्यांच्याकडून निश्चित केलेल्या दराप्रमाणे पैसे स्विकारले. रुग्णालयाच्या खात्यावर कमी रक्कमेचा भरणा केला. सदरच्या एडीट केलेल्या पावत्या या ख-या असल्याचे वरिल विभागांना दाखवुन सदर खोटया पावत्यांचा वापर करुन रुग्णालयाच्या एकुण ६८,२६० रु चा अप्रमाणीकपणे अपहार केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हि घटना (दि. ०२/०३/२०२३ ते दि. १४/११/२०२३) दरम्यान घडली. फिर्यादी संजीव शांताराम भांगले यांनी आरोपी अदित्य अंकुश खंडागळे याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. पिंपरी पोलीस ठाण्यात १२०४/२०२३ भादवि कलम ४२०,४०६ ४६५,४६७, ४६८,४७१, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि घाडगे पुढील तपास करीत आहेत.















