- महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० डिसेंबर २०२३) :- कमी दाबाने, अपुरा पाणी पुरवठा होत असल्याच्या मुद्यावर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जाहीर स्पष्टीकरण दिले आहे.
गृहप्रकल्पांमध्ये नळाद्वारे येणारे पाणी तळमजल्यावरील टाकीत साठवावे. त्या टाकीतील पाणी इलेक्ट्रिक मोटार किंवा पंपाद्वारे इमारतीवर बांधलेल्या टाकीत चढवून ते पाइपलाइनद्वारे प्रत्येक सदनिकेला पुरवठा करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ज्यांच्याकडे साठवण टाक्यांची व्यवस्था नाही, त्यांनी साठवण टाकी बांधून घ्यावी, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता श्रीकांत सवणे यांनी केले आहे.