न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जानेवारी २०२३) :- विशाल काळभोर यांची राष्ट्रवादीच्या पिपरी विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते शनिवारी (दि. ६) विशाल काळभोर यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पिपरी विधानसभा मतदारसंघात पक्षाची ध्येय-धोरणे आणि अजितदादांनी केलेला शहराचा विकास घरोघरी पोहचविण्याच्या दृष्टीने कार्य करण्याची ग्वाही काळभोर यांनी दिली.













