- “एकच वादा अजितदादा ऐवजी दिल्या ‘एकच वादा महेशदादा’ च्या घोषणा?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जानेवारी २०२३) :- मोशीत राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठावर पक्षाच्या रूपाली चाकणकर बोलत असतांना समोरून कार्यकर्त्यांनी ” एकच वादा” अशी आरोळी ठोकली. पण, त्याला उपस्थितांमधूनच काही जणांनी “एकच वादा महेशदादा” अशी घोषणा दिली. त्याचा व्हिडीओदेखील समोर आला आहे.
उपमुख्यमंत्री व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांच्या समोरच घडलेल्या या प्रसंगामुळे पक्षाची पुरती फजिती उडाली. आठ ते दहा वेळा ‘एकच दादा महेश दादा’ अशी आरोळी ठोकल्याने पक्षाचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारीदेखील बुचकळ्यात पडले.
अखेर माजी आमदार विलास लांडे यांनी मध्यस्थी करत परिस्थिती आटोक्यात आणली. राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात ‘एकच दादा अजित दादा’ असा सहसा आवाज ऐकू येतो, परंतु पिंपरी चिंचवडच्या बालेकिल्ल्यात ‘एकच दादा महेशदादा’ अशा घोषणा ऐकू आल्याने याची राजकारणात एकच चर्चा सुरू झाली.
विरोधकांनी त्यांच्या मनाने हा व्हिडीओ केला आहे. दादांच्या समोर बोलण्याची अशी कुणाची हिम्मत आहे? ‘एकाच वादा अजित दादा’ हाच आमच्यासाठी निर्णायक विषय आहे.
– मा. अजित गव्हाणे, शहराध्यक्ष (पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी अजित पवार गट)…कार्यक्रमात घोषणा दिल्याचा जाणूनबुजून व्हिडीओ विरोधकांनी एडीट केला आहे. सबंधित व्हीडीओ विरोधकांनी डबिंग केला आहे. लाईव्ह व्हिडीओमध्ये स्पष्ट कळेल खऱ्या घोषणा काय आहेत त्या. – मा. पंकज भालेकर मा. नगरसेवक, पिंपरी चिंचवड मनपा…













