न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ फेब्रुवारी २०२४) :- पिंपरी चिंचवड नविन शहराध्यक्षांची निवड झाल्यानंतर युवक शहराध्यक्ष रविराज काळे यांनी वरीष्ठांवर नाराज होऊन प्रदेश कार्याध्यक्ष अजित फाटके यांचेकडे आपला पदाचा राजीनामा पाठवला आहे.
पहिले शहराध्यक्ष बदलण्यासाठी शहरातील २५ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. तरीसुद्धा वरीष्ठांनी तीच चुक केल्यामुळे नाराज होऊन आपण युवक शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे, असे त्यांनी जाहीर केले. यापुढे कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार, असेही काळे यांनी जाहीर केले.
वरीष्ठांनी घेतलेल्या निर्णयामुळे पिंपरी चिंचवड शहरातील आम आदमी पार्टी वाढण्यास खिळ बसेल आणि शहरात असलेले कार्यकर्ते देखिल गळायला सुरुवात होईल. हळूहळू शहरात नावाला असलेली पार्टी देखिल संपेल. वरीष्ठांनी वेळीच आपली चुक सुधारावी, असे काळे म्हणाले.