न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ मे २०२४) :- चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार जनजागृतीसाठी आणि मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी गोडांबे चौक – रहाटणी येथे मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वीप टिमचे नोडल अधिकारी राजाराम सरगर व स्वीप टिममधील इतर कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती करण्यात आली.
यावेळी तेथे उपस्थित असलेले मतदार नागरीक यांना निवडणूकीत मतदान करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये “मतदान तुमचा अधिकार आहे, मतदान करायचे आहे आपले कर्तव्य बजावयाचे आहे,” अशा घोषणा देण्यात आल्या, तसेच त्यांना मतदान करण्याचे आव्हान करण्यात आले.