न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२४) :- चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, मधील प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज, प्रतिभा ज्युनिअर कॉलेज, प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज (सीबीएसई) प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल, सोमाटणे व प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण उद्योगपती व प्रख्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमणलाल जैन यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी त्यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले.
कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ.भूपाली शहा, प्राचार्य डॉ. अरुणकुमार वाळुंज, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ.राजेंद्र कांकरिया, पी.आय.बी.एम.चे संचालक डॉ.सचिन बोरगावे, प्राचार्य डॉ.पौर्णिमा कदम, डॉ.पद्मावती विडप, सविता ट्रॅव्हीस, उपप्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, डॉ. वनिता कुर्हाडे, लीजा सोजू, समन्वयीका गुलनाज खान यांच्या मार्गदर्शनाखाली 120 हून अधिक विद्यार्थ्यांनी सैनिकी वेशभूषा परिधान करून बँड पथका समवेत परेड करीत उपस्थितांना मानवंदना दिली. यावेळी पालक, विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे उद्योजक रमणलाल जैन यांच्या हस्ते महाविद्यालयात विशेष नैपुण्य मिळविलेले प्राध्यापक, शिक्षक, खेळाडू, गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू देत त्याचा गुणगौरव करण्यात आला. दिप प्रतिभा या नियतकालिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, नृत्य, सायबर वॉरियर्सनी समाजातील सायबर सुरक्षेच्या आव्हानांना सामोरे कसे जायचे याबाबत विविध प्रसंगाच्या माध्यमातून नाटिका सादर करून उपस्थितांना शपथ दिली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उद्योजक व प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते रमणलाल जैन मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच आपण देशासाठी काय करू शकतो, याचा विचार प्रत्येक विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी करावा, आजचे विद्यार्थी उद्याचे सुजाण नागरिक आहात हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. विकसित भारताचे ध्येय गाठण्यासाठी शिक्षक व विद्यार्थी महत्वाची भूमिका बजावू शकतात., असे रमणलाल जैन म्हणाले.
कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ.दीपक शहा म्हणाले, विद्यार्थ्यांनी समाजातील अन्याय अत्याचाराविरुद्ध सक्षमपणे उभे राहिले पाहिजे. नवीन तंत्रज्ञानाचे स्वागत करून ते प्रत्येकाने आत्मसात करावे. विद्यार्थ्यांच्या ईच्छा, अपेक्षा, नाविन्याची प्रबळ जिज्ञाश्येला योग्य दिशा दिली. तर; मला वाटते विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होईल. आजचा विद्यार्थी नवीन युगात वावरत असला तरी आई-वडिलांनी दिलेले संस्कार विसरू नका. यशस्वी जीवन जगण्यासाठी भगवत गीता, रामायणातील श्लोकांचा अभ्यास करून ते आपल्या जीवनात अंगीकारावे. आई-वडील, गुरूजनांनी दिलेले संस्कार व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकसित भारताचे स्वप्न एकजुटीतून साकारू शकतो, असा विश्वास यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रोहित अकोलकर, प्रा. ज्योती इंगळे यांनी केले. ध्वजारोहणासाठी डॉ. आनंद लुंकड, प्रा.पांडुरंग इंगळे, प्रा. शबाना शेख यांनी विशेष परिश्रम घेतले., तर आभार महाविद्यालयाचे प्राचार्य अरुणकुमार वाळुंज यांनी मानले.