न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२४) :- रहाटणी क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित, न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडिअम स्कूल येथे 15 ऑगस्ट उत्साहात साजरा करण्यात आला. सुभेदार बळीराम खांडेभराड यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या निमित्ताने विविध संस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी नगरसेविका निर्मला कुटे, सुरेश भालेराव (माजी पोलीस उपनिरीक्षक व मेजर समता सैनिक दल), संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, सेक्रेटरी संदीप चाबुकस्वार, देवेंद्र तायडे (कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस एस.पी.पक्ष पि.चि.शहर,) के.डी वाघमारे,(सचिव राष्ट्रवादी काँग्रेस एस.पी.पक्ष पि.चि.शहर) विशाल जाधव( ओबीसी सेल ) सुभाष दहिफळे, सुहास देशमुख, संकेत कुटे (सामाजिक कार्यकर्ते) शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या निमित्ताने दहावी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कालवश श्री विद्याधर लक्ष्मण चाबुकस्वार यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. इयत्ता पहिली, दुसरी सातवी व प्री – प्राईमरी विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीत, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. स्वाती वक्टे, मोनिका भाजीभाकरे, अनिता रोडे या शिक्षकांनी मराठी, हिंदी, इंग्रजी मध्ये माहिती देशाबद्दल सांगितली.
“15 ऑगस्ट 1947 ला भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळाले परंतु देशात माणसाला, माणसाप्रमाणे,माणूसपण मिळवून देऊन सर्वसामान्यांना स्वातंत्र्यपणे वागण्याचा, बोलण्याचा व लिहीण्याचा हक्क मिळवून देणारे तसेच प्रत्येक व्यक्तीला विकासाची समान संधी उपलब्ध करून देणारे डॉ.भिमराव रामजी आंबेडकर यांचे मोलाचे योगदान आहे” असं मत सुभेदार बळीराम खांडेभराड यांनी व्यक्त केले.
तसेच “वंदे मातरम” म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या विविध कार्यक्रमांनी सजलेल्या 15 ऑगस्ट दिनाचे विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात ‘आले. सूत्रसंचालन डिंपल काळे व रेणू राठी मॅडम यांनी केले.तसेच पाहुण्यांचे आभार प्रज्ञा शिरोडकर मॅडम यांनी केले.