न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव दाभाडे (०२ डिसेंबर २०२४) :- तळेगाव दाभाडे नगरपरिषदे च्या वतीने दिव्यांग बेरोजगारी भत्ता नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या योजनेसाठी नगरपरिषदेचा निव्वळ उत्पन्नाच्या ५% निधी राखीव ठेवण्यात आला आहे ,अशी माहिती मुख्यधिकारी विजय कुमार सरनाईक आणि उपमुख्याधिकारी ममता राठोड यांनी दिली.
नगरपरिषदेचा प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, तळेगाव शहराच्या सीमेतील एकुण ४०० दिव्यांग व्यक्तीती चीं नोद झाली आहे. या लाभार्थीच्या हयातीची खात्री आणि त्त्यांचा तळेगाव शहरातील वास्तव तपासण्यासाठी तसेच नोंदणी करण्यासाठी ३१ डिसेंबर ही अंतिम तारीख निश्चित केली आहे.
सदर नोंदणी साठी आवश्यक कागदपत्रमध्ये दिव्यांग प्रमाणपत्र, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड, बॅंकपासबुकचीं झेरॉक्स प्रत आणि एक पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहे. लाभार्थ्यानी ही कागदपत्रे घेऊन नगरपरिषद कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेमुळे दिव्यांग लाभार्थीना आर्थिक साहाय्य मिळून त्त्यांच्या जीवनात सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.












