न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १ जानेवारी २०२६):- सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या कार्यकाळात प्रामाणिकपणे व जबाबदारीने बजावलेली सेवा ही संस्थेच्या कार्यक्षमतेसाठी मोलाची ठरली असल्याचे प्रतिपादन उप आयुक्त संदीप खोत यांनी केले तसेच सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य आरोग्यदायी,आनंदी व समाधानकारक जावे अशा शुभेच्छा देखील त्यांनी दिल्या आणि पुढील जीवनप्रवासात नवे उपक्रम व सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा असे मत व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत मधुकर पवळे सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात माहे डिसेंबर २०२५ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या २२ तर स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या ५ अशा एकूण २७ कर्मचाऱ्यांचा उप आयुक्त यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यावेळी शुभेच्छा देताना ते बोलत होते.
या कार्यक्रमास मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे बबन झिंजुर्डे तसेच मुख्य लिपिक उमेश बांदल,माया वाकडे आणि महापालिका कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे नातेवाईक उपस्थित होते.
माहे नोव्हेंबर २०२५ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर ढवळे, मुख्याध्यापिका शामला शिंदे, लेखापाल चंद्रकला फुलसुंगे, सिस्टर इन्चार्ज अनिता लोंढे, जयश्री फाळके, प्रयोगशाळा सहाय्यक सुधाकर रासकर, कनिष्ठ अभियंता सतिश तायडे, वीजतंत्री भास्कर नेटके, वाहनचालक शंकर शिंगाडे, मनोज माछरे, मजुर ज्ञानेश्वर काळभोर, राजू भुजबळ, शहाजी बोत्रे, विलास माने, रखवालदार बाबुराव कायंदे, मुकादम जयश्री गडदे, स्प्रे कुली अरूण राक्षे, सफाई कामगार मुक्ताबाई लष्करे, रमा बाराथे, सफाई सेवक गीता तांबोळी, राजू बारसे, गटरकुली राजेश खरात यांचा समावेश आहे.
तर स्वेछानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये मजूर दिनकर देवाचे, सफाई कामगार पांडुरंग काकडे, संजय भोंडवे, सोपान लोहकरे, गोदावरी मोरे यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद जगताप यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.












