न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मे २०१९) :- रामनाथ सोनवणे, बाळू वाघिरे आणि त्यांच्या साथीदारांनी गणेश यांच्याकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी वारंवार गणेश यांना फोन करून धमकी दिली.
तसेच रस्त्याने जात असताना गाडी आडवी लावून त्रास दिला. (१४ डिसेंबर २०१८ ते १४ मे २०१९) या कालावधीत नाणेकरवाडी आणि ताथवडे या परिसरात हा प्रकार घडला आहे. गणेश यांचे मेहुणे संदीप पवार यांचे ताथवडे येथे हॉटेल आहे. त्या हॉटेलवर जाऊन आरोपींनी संदीप पवार यांना २५ लाख रुपयांची खंडणी मागितली.
खंडणी न दिल्यास त्यांनाही मारण्याची धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत. गणेश शांताराम जाधव (वय ३५, रा. नाणेकरवाडी, चाकण, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी रामनाथ सोनवणे (रा. कुरूळी ता. खेड), बाळू आप्पा वाघिरे (रा. पिंपरी) आणि त्यांच्या तीन ते चार साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


















