न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मे २०१९) :- अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे लॅचलाॅक तोडून घरात प्रवेश केला व बेडरूममधील लाकडी कपाटाचे ड्रावर उचकटून किमती ऐवज व महत्वाचे कागदपत्र घेऊन पोबारा केला आहे.
यात चोरट्यांनी सोन्याचे व हिऱ्याचे १५७.५ ग्रॅम वजनाचे पाच लाख ८९ हजार रुपये किमतीचे दागिने व घड्याळ तसेच आर्मी कॅन्टीन कार्ड, हॉस्पिटल कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, एटीएम कार्ड, मतदान ओळखपत्र, गॅस कार्ड अशी महत्त्वाची कागदपत्रे चोरट्यांनी चोरून नेली.
ही घटना मंगळवार (दि. १४) रोजी पहाटे चारच्या सुमारास काळभोरनगर येथे उघडकीस आली. रत्नकांत शिवराम भोसले (वय ५९, रा. काळभोरनगर चिंचवड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











