न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जानेवारी २०२५) :- मागील निवडणुकीतील पराभवाने खचून न जाता महानगरपालिका निवडणुका लढणार आहोत. स्वबळाचा नारा दिला म्हणजे महाविकास आघाडी तुटली किंवा संपली असा अर्थ निघू शकत नाही.
मुंबई पुरता स्वबळाचा नारा आहे. आमच्या पक्षाचा तिथे पगडा आहे. आमची पकड आहे. स्वबळावर लढावं हे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली. ते पिंपरी चिंचवड शहरात आहेत. त्यावेळी ते बोलत होते.
मूळ शिवसेना आणि राष्ट्रवादीला फोडण्यात आलं. त्यापद्धतीने एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष फोडला जाईल. पक्ष फोडण्याची भाजपला चटक लागली आहे. त्यांच्या तोंडाला रक्त लागलं. तोपर्यंत हे फोडाफोडीचे राजकारण सुरू राहणार असल्याच त्यांनी सांगितले.











