न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रुवारी २०२५) :- पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील मधुकर पवळे सभागृह येथे फेब्रुवारी २०२५ अखेर नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या ११ आणि स्वेच्छानिवृत्ती होणाऱ्या २ अशा एकुण १३ कर्मचा-यांचा आज अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, त्यावेळी मार्गदर्शन देताना ते बोलत होते.
या कार्यक्रमास मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रूण दगडे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे नातेवाईक, विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये क्ष किरण शास्त्रज्ञ रसिका वाघमारे, लेखाधिकारी अनिल पासलकर, मुख्य लिपीक मंगल म्हस्के, बायोमेडिकल इंजिनिअर सुनिल लोंढे, लाईव्ह स्टॉक सुपरवायझर सुनिल सातपुते, मुख्याध्यापक मंदाकिनी घोरपडे, रविंद्र शिंदे, शाहिदा शेख, क्रीडा शिक्षक लक्ष्मण माने, उपशिक्षिका लिला कोल्हे, रखवालदार प्रदीप गव्हाणे आदींचा समावेश आहे. तर स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये सफाई कामगार शंकरलाल चाॅवरिया, मधुकर सोनावणे यांचा समावेश आहे.















